पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पित्तासाठी (acidity )घरगुती उपाय

इमेज
  पित्त कशामुळे वाढत ? Video पित्ताचा त्रास होणे म्हणजे नक्की काय होत हे आपण या लिंक वर क्लीक करून पाहू शकता   अन्न पचवण्यासाठी पित्त एक महत्वपूर्ण घटक द्रव्य आहे .आपली immunity boost करण्यासाठी पित्त कार्यरत असत.  पित्त जर प्राकृत असेल तर आपली पचन क्रिया चांगली असते. पचन क्रिया चांगली असेल तर आहार योग्य पद्धतीने पचतो आणि आपल्या शरीराला योग्य पोषण देतो .आपल्या शरीराला योग्य पोषण मिळाल असता आपली immunity boost होतें. हेच पित्त्त प्राकृत ठेवण्यासाठी काय करावे? पित्त प्राकृत ठेवण्याचे उपाय  1 ) योग्य वेळेला  आहार घेणे  भूक लागली असंताना आहार न घेणे ही सवय टाळावी  2) अतिप्रमाणात आहार टाळावा . आपल्याला जेवढी भूक आहे तेवढाच आहार घेणे. 3) पोटात जळजळ होणे , पोटात  मळमळणे , डोकं देखणे हे त्रास होत असल्यास 1च बडीसोफ + 1च धणे+ 1च खडी साखर  हे सर्व एकत्र  1ग्लास पाण्यात उकळवून अर्धा ग्लास होई पर्यंत उकळवणे व गाळून घेणे . त्यानंतर हा काढा  एकाच वेळेला न घेता या काढया मधील 2 च दर 5मिनिटांच्या अंतराने हळू हळू घेत राहावे. असे सकाळ संध्याकाळ दिवसातून 2 वेळा करणे  (*ज्यांना मधुमेह आहे त्यांनी या मध्ये स

Immunity booster- 11 नियम

इमेज
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नक्की काय करावे ? हा प्रश्न सध्या सर्वानाच पडत आहे . Immunity वाढवण्यासाठी अनेक प्रॉडक्ट सध्या बाजारात विकले हे जात आहे. आपण घरच्या घरी कोणते उपाय करू शकतो? उपक्रम: १. रोज केवळ गरम पाण्याचेच सेवन करावे. २. रोज किमान ३० मिनिटे ध्यान, प्राणायाम आणि योगासने करावी. (टीप: आपणांस उचित प्राणायाम आणि आसने जाणून घेण्यास वैद्यांचा सल्ला घ्यावा.) ३. स्वयंपाक करताना हळद, जिरे, धने, लसूण इ मसाल्यांचा वापर करावा. ४. रोज सकाळी १० ग्राम च्यवनप्राश खावा. मधुमेहींनी शुगर फ्री च्यवनप्राश घ्यावा. (टीप: च्यवनप्राश खाऊन लगेच दूध पिऊ नये. मधुमेहींनी तसेच च्यवनप्राश अनुपलब्ध असल्यास आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा.) ५. तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ आणि मनुका घातलेला 'हर्बल टी' प्यावा. यात लिंबू रसदेखील घालू शकता. (टीप: पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी काळी मिरी टाळावी. ५-६ काळ्या मनुका गरम पाण्यात भिजवून त्या कोळून मग अन्य घटक त्यात घालून एकदा उकळी काढावी आणि मग घ्यावे. या हर्बल टीचे सेवन सायंकाळी करणे अधिक उचित.) ६. १५० मिली दुधात अर्धा चमचा हळद घालून दिवसातून १-२ वेळा प्या

Immyunity booster -पावसाळ्यात immunity वाढवणारा आहार

इमेज
  https://youtu.be/fVfIKKefr9g Click hear to watch full video आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा घटक आहे . ऋतू नुसार आहाराचे सेवन केले असता आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत होते . सध्या पावसाळा चालू आहे. पावसाळ्यात कोणत्या प्रकारचा आहार आपण घेतला पाहिजे हे पावसाळ्याची  थाळी या स्वरूपात आम्ही घेऊन आलो आहोत.खालील विडिओ  नक्की पहा  #पावसाळ्याची आहारात घेणारे पदार्थ 1) आल आणि सैंधव  2)लोणचं 3)मुगाची डाळ 4) फळ भाजी  5) चपाती  6) भात 7)दही  8)ताक  वरील सर्व पदार्थांचा समावेश या थाळी मध्ये होतो .असा आहार घरातला असता .आरोग्य चांगले टिकवून ठेवता येते Click hear to watch full video डॉ. सुशांत शांताराम नागरेकर 

Immyunity booster - बाल्यावस्थेतील आहार

इमेज
बाल्यावस्थेतील आहार-विहार (सर्वांगीण वाढीचा पाया) ☘☘☘☘☘☘☘☘ आज मानव २१ व्या शतकाकडे वाटचाल करत आहे. चंद्रच नव्हे तर मंगळावर सुद्धा स्वारी करत आहे. क्रांतीतील नवं-नवीन शिखरे पादाक्रांत करीत  आहे. अफाट अशी प्रगती झाली आहे.  पण............................... खरंच हि प्रगती सृजनशील आहे का? ह्याला आपण सुधारणा म्हणणार का?   खरं सांगाल तर मला वाटते कि सध्या ही जी काही प्रगती आहे ती फक्त आणि फक्त भौतिक साधनांची.. निरोगी आयुष्याची तर नक्कीच नाही! अहो थोडं मागे वळून पहिले तर दिसून येईल की, माणूस चंद्रावर पोहचण्याच्या आधी सरासरी १०० वर्षे जगतच होता, आणि नुसतं जगताच नव्हता तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुखी व निरोगी आयुष्याचा आनंद घेत होता, आणि आज वयाची पन्नाशी गाठली कि कसल्यातरी गोळ्या खाऊन स्वतःला जगवावं लागत. आता थोडा विचार करा हे असच चालू राहील तर काय होईल? सध्याची पिढी ५० ते  ६० वर्षे जगतेय! पण आपली येणारी पिढी किती वर्षे जगेल माहितेय?... सरासरी ३० ते ४० वर्षे...!!! तर मग जर या येणाऱ्या पिढीला आणि पर्यायाने आधी आपल्याला ही खऱ्या अर्थाने निरोगी व सदृढ आयुष्य जगायचे असेल तर योग्यच आहार घेतला पाहिजे

Immyunity boost-बाळाला कितव्या महिन्यात अन्न द्यावे ?

इमेज
*माझं बाळ 4 महिन्यांचा झालं आहे .पुढच्या महिन्या (पाचव्या महिन्या  पासून ) पासून बाळाला अन्न दिल तर चालेल *बाळाला कितव्या महिन्या पासून अन्न  द्यायला सुरुवात करावी?* सध्या हे प्रश्न बरेच पालक मला विचारत असतात.त्यांचा विचारण्याचा उद्देश असा असतो "डॉक्टर , मला पुढच्या महिन्यातच कामावर रुजू होऊ लागणार आहे .त्यामुळे पुढच्या महिन्यात बाळाला दिवसभर दूध मिळणार नाही मग आतापासून अन्नाची सवय लावली तर बरं होईल ना?"       पालकांचा विचार एका दृष्टीने गमतीदार असतो .सध्याच्या तिव्रगतीने धावणाऱ्या जगाला फास्ट फूड , फास्ट सरफींग , फास्ट ट्रॅव्हलिंग ,etc ची सवयच लागली आहे. त्यामुळे बाळाची वाढही फास्ट व्हावी अशी बऱ्याच पालकांची अपेक्षा असते.         आपण कधी सूर्याला सांगतो का , लवकर उगव लवकर मावळ , वडाच्या झाडाला म्हणतो का लवकर वाढ आम्हाला सावली लवकर पाहिजे .हे सर्व निसर्गाचे भाग आहे . मनुष्याला जन्म देणारी स्त्री असली तरी , मनुष्य खर अपत्य निसर्गाचे आहे.         बाळाची पचनशक्ती निसर्गतः हळू हळू सुदृढ होत असते.पहिले पाच महिने बाळाची पचन क्रिया दुधालाच पचवू शकते .म्हणून पहिल्या पाच महिन्यात बाळा

वजन वाढवायचे असल्यास काय करावे ?

इमेज
"पालकांच्या समस्या"-      मुलां संबंधित पालकांना  अनेक समस्या असतात . जसे की ,मुलांचं वजन कसं वाढेल?उंची कशी वाढेल ? इत्यादी  यासाठी मुलांनी काय खायचं हे पालक ठरवतात. वेगवेगळ्या जाहिराती पाहून सिंथेटिक टॉनिक चा वापर मोठ्याप्रमाणावर करतात. या टॉनिक कंपन्या  आपल्या टॉनिक चा खप वाढावा म्हणून ते  चविष्ट  तयार करतात.  जाहिरातींमध्ये असे दाखवतात ,मुलांनी जर या टॉनिक चे सेवन केले तर मुले सुपरमॅन बनतील ,मुलाची उंची ,वजन लगेच वाढेल.या सर्व टॉनिक सेवनाने पोट बिघडते व मुल आजारी पडतात .आणि  त्यावर उपाय म्हणून वेगवेगळ्या औषधांचे सेवन केले जाते.      खरतर मनुष्य प्राण्याला जन्म देणारी स्त्री असली तरी , तो अपत्य निसर्गाचा आहे .बाळाचे पोषण चांगले व्हावे म्हणून निसर्ग नेहमीच प्रयत्नशील असतो .त्यामुळे असे सिंथेटिक टॉनिक मुलांना देण्यापेक्षा नैसर्गिक पदार्थांपासून मुलांचे पोषण कसे होईल या कडे जास्त  लक्ष दिले पाहिजे.नैसर्गिकरीत्या मुलांना जेवढी भूक लागते तेवढाच त्यांना आहार दिला पाहिजे.बरेच पालक अतिप्रमाणात मुलांना खाऊ घालतात .त्यामुळे अपचन होते व मुलांचे पोषण पाहिजे तसे होत नाही.        मुलांन

मुलांना फोन देण्या पासून सावधान

इमेज
 #जागो पालक# पालकाना नेहमीच अनेक प्रश्न भेडसावत असतात.पण सध्या सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्न म्हणजे " मुलांना मोबाइल फोने देणे योग्य कि आयोग्य?". या प्रश्नाचे नक्की उत्तर काय असावे? या साठी कालच्या व्याख्यानाचे  आयोजन श्री क्लास तर्फे करण्यात आले होते.पालकां कडून उत्तम प्रतिसाद मिळाला.श्री सुबोध मिस्त्री सर , श्री संदीप मोरे सर व डॉ गायत्री नागरेकर यांनी उत्तम मार्गदर्शन पालकांना केले या बद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत . खाली काही मुद्दे लिखाणाच्या स्वरूपात स्पष्ट करत आहे. १. १४ वर्षाखालील मुलांना मोबाईल देणे योग्य आहे का ?  - ज्या पालकांना भीती असते कि आमची मुले यामुळे मागे राहतील किंवा दुनिया तंत्रज्ञानाबरोबर जाईल व माझ्या मुलाला काही जमणार नाही अशा पालकांनी त्यांचा स्वतःचा स्मार्टफोन संध्याकाळी  ठराविक वेळ आपल्या मुलाला नव्या गोष्टी शिकण्यासाठी द्यावा.   - मुलांना स्मार्टफोन घेण्याऐवजी घरात एक कॉम्प्युटर (लॅपटॉप नाही) घ्यावा व त्याला इंटरनेट कनेक्शन जोडावे. तो कॉम्प्युटर असा ठेवावा कि जेणेकरून घरातल्या कोणत्याही जागेवरून सहज दिसेल.  यामुळे मुलं चुकीच्या गोष्टी करण्यास धजाव

मुलांसाठी सर्वात जास्त पौष्टिक असणारा आहार

इमेज
#जागो #पालक# #पालकांच्या #समस्या डॉक्टर तुम्ही सांगता बिस्कीट, ब्रेड,सिंथेटिक टॉनिक मुलांना देऊ नका.मग मुलांनी खायचं तरी काय? बरेच पालक हा प्रश्न मला विचारतात.त्यांना अस वाटत ब्रेड , बिस्कीट शिवाय या जगात काही पदार्थच नाही आहेत.खर तर थोडं कष्ट घेऊन पदार्थ बनवण्याचा सर्वाना कंटाळा आहे .ब्रेड कसा 'रेडी टू ईट '  असतो.जास्त मेहनत घेण्याची गरज नाही आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे वेळही वाचतो.         मला नेहमी एक प्रश्न पडतो एवढा वेळ वाचवून आपण काय करतो.ब्रेड,सिंथेटिक पदार्थ वेळ वाचवतात , पण हाच वेळ नंतर हॉस्पिटलच्या एका बेड वर वाया जात असतो.याचा आपण विचार करतो का? असो काय खायचं नाही या पेक्षा काय खायचं याचा विचार आपण करू.         मनुष्य प्राणी निसर्गाचे अपत्य आहे.त्यामुळे निसर्ग बरोबर आपल्या अपत्यांना सांभाळत असतो.एक वाक्य वाचनात आले होते "local food is super food"ज्या देशात जे पिकतं त्या देशातील लोकांनि तेच खावे . जसे की कोकणात नारळाचे पीक जास्त येते . त्यामुळे तेथील लोकांच्या आहारात नारळाचेे प्रमाण जास्त असते . उत्तर भारतात मोहरीचे प्रमाण जास्त येते तर तेथील लोक मोहरीच

मुलांची भूक वाढण्यासाठी काय करावे?

इमेज
 *"यशस्वी पालकत्व"* पालकांच्या समस्या अनेक पालक मला प्रश्न विचारतात.आमच्या मुलाला भूख लागतच नाही.काय करावे ? *या प्रश्नाचे उत्तर आम्ही तीन टप्प्यात देणार आहोत .पालकांचे मनोगत , मुलांचे मनोगत आणि आदर्श पालकांचे मनोगत .यामध्ये सर्व पालकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.* *पालकांचे मनोगत*  ====================================              आम्हाला आमच्या मुलांची खूप काळजी वाटत असते.त्यांच्या आरोग्य संदर्भात आम्ही खूप विचार करत असतो. त्यांच्या खाण्या-पिण्याकडे खूप बारकाईने लक्ष देत असतो.घरात खूप काही खाणारे पदार्थ आणून ठेवतो.जसे की ड्रायफ्रुट्स ,fruits इत्यादी. पण आमची मुलं काही खाताच नाहीत.त्यांना भूख लागतच नाही .कधी कधी तर आम्हाला लाडी गोडी लावून भरवावं लागत तेंव्हा कुठे ते थोडास खातात.मुलांना फक्त चटपटीत पदार्थ ,चॉकलेट, ice-cream खायला हवे असते.आम्ही त्यांना किती समजावलं चॉकलेट ने दात खराब होतात, ice cream ने सफडी होते.पण ते ऐकतच नाही अनु हट्ट करतात.मूलं नाराज व्हायला नको म्हणून आम्ही सर्व घरी आणून ठेवतो.पण मुलांना चॉकलेट , इस क्रीम सारख सारखं हवं असत. जेवायला कधीच नको असत.क