मुलांना फोन देण्या पासून सावधान

 #जागो पालक#


पालकाना नेहमीच अनेक प्रश्न भेडसावत असतात.पण सध्या सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्न म्हणजे " मुलांना मोबाइल फोने देणे योग्य कि आयोग्य?".

या प्रश्नाचे नक्की उत्तर काय असावे? या साठी कालच्या व्याख्यानाचे  आयोजन श्री क्लास तर्फे करण्यात आले होते.पालकां कडून उत्तम प्रतिसाद मिळाला.श्री सुबोध मिस्त्री सर , श्री संदीप मोरे सर व डॉ गायत्री नागरेकर यांनी उत्तम मार्गदर्शन पालकांना केले या बद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत .

खाली काही मुद्दे लिखाणाच्या स्वरूपात स्पष्ट करत आहे.


१. १४ वर्षाखालील मुलांना मोबाईल देणे योग्य आहे का ? 

- ज्या पालकांना भीती असते कि आमची मुले यामुळे मागे राहतील किंवा दुनिया तंत्रज्ञानाबरोबर जाईल व माझ्या मुलाला काही जमणार नाही अशा पालकांनी त्यांचा स्वतःचा स्मार्टफोन संध्याकाळी  ठराविक वेळ आपल्या मुलाला नव्या गोष्टी शिकण्यासाठी द्यावा.  


- मुलांना स्मार्टफोन घेण्याऐवजी घरात एक कॉम्प्युटर (लॅपटॉप नाही) घ्यावा व त्याला इंटरनेट कनेक्शन जोडावे. तो कॉम्प्युटर असा ठेवावा कि जेणेकरून घरातल्या कोणत्याही जागेवरून सहज दिसेल.  यामुळे मुलं चुकीच्या गोष्टी करण्यास धजावणार नाहीत. 


पालकांनी गोष्टी सहज उपलब्ध करून देऊन स्वतःची जबाबदारी झटकणं चुकीचं आहे.  आपल्या पाल्याची प्रायव्हसी ब्रेक न करता तो/ती काय करतेय  असणं महत्वाचं. 


२. सततच्या मोबाईल वापराने आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात?


- तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक आर्टिकल आल होतं ज्यामध्ये सतत तंत्रज्ञानाचा वापर करून जे मानसिक रोग उदभवले आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचा राज्य म्हणून पूर्ण भारतात दुसरा नंबर लागतो.  जवळजवळ सव्वा लाख लोक सध्या मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचार घेत आहेत.  मुंबईचा पूर्ण भारतात शहर म्हणून पहिला नंबर लागतो. 


- अवेळी भूक लागणे किंवा भूक मरणे, निद्रानाश, चिडचिड होणे अशा प्रकारचे त्रासही जाणवू शकतात.  


- एकाग्रता कमी होते


- सतत मोबाईल चाळल्याने डोळ्यांवर परिणाम होतो. 

डोळ्यांचे आजार वाढतात .अति प्रकाशित प्रकाशज्योत डोळ्यांवर सतत पडत असेल तर त्याचा परिणाम पोटावरही होत असतो.जसे आपल्याला आवडणारे अन्न आपण पाहिले की लगेच तोंडाला पाणी सुटते व भूक लागते .व बिभस्त दृश्य पहिले असता पोटात मळमळते किंवा उलटी होते.तसेच अति मोबाईलच्या वापरामुळे पोटावरही परिणाम होतो.


 पालकांचे प्रश्न सोडवणे व आपली पुढची पिढी  सुदृढ व सक्षम बनवणे हेच एक ध्येय घेऊन जागो पालक पुढे चालत आहे .


डॉ सुशांत शांताराम नागरेकर 

@ जागो पालक, 

अथर्व आयुर्वेद चिकित्सालय,

नेरुळ ,नवी मुंबई

+91 9987 493 534

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Immyunity booster -पावसाळ्यात immunity वाढवणारा आहार

पित्तासाठी (acidity )घरगुती उपाय