पित्तासाठी (acidity )घरगुती उपाय

 


पित्त कशामुळे वाढत ? Video

पित्ताचा त्रास होणे म्हणजे नक्की काय होत हे आपण या लिंक वर क्लीक करून पाहू शकता 


 अन्न पचवण्यासाठी पित्त एक महत्वपूर्ण घटक द्रव्य आहे .आपली immunity boost करण्यासाठी पित्त कार्यरत असत. 

पित्त जर प्राकृत असेल तर आपली पचन क्रिया चांगली असते. पचन क्रिया चांगली असेल तर आहार योग्य पद्धतीने पचतो आणि आपल्या शरीराला योग्य पोषण देतो .आपल्या शरीराला योग्य पोषण मिळाल असता आपली immunity boost होतें.


हेच पित्त्त प्राकृत ठेवण्यासाठी काय करावे?


पित्त प्राकृत ठेवण्याचे उपाय 


1 ) योग्य वेळेला  आहार घेणे 

भूक लागली असंताना आहार न घेणे ही सवय टाळावी 

2) अतिप्रमाणात आहार टाळावा . आपल्याला जेवढी भूक आहे तेवढाच आहार घेणे.

3) पोटात जळजळ होणे , पोटात  मळमळणे , डोकं देखणे हे त्रास होत असल्यास

1च बडीसोफ + 1च धणे+ 1च खडी साखर

 हे सर्व एकत्र  1ग्लास पाण्यात उकळवून अर्धा ग्लास होई पर्यंत उकळवणे व गाळून घेणे . त्यानंतर हा काढा  एकाच वेळेला न घेता या काढया मधील 2 च दर 5मिनिटांच्या अंतराने हळू हळू घेत राहावे. असे सकाळ संध्याकाळ दिवसातून 2 वेळा करणे 


(*ज्यांना मधुमेह आहे त्यांनी या मध्ये साखरेचा वापर करू नये .)

4)अंगावर पित्त उठत या लिंक वर क्लीक करा

5) 3 च आवळा ज्यूस + पाव च सुंठ + 1च खडी साखर सकाळी उपाशी पोटी घेणे .

हे उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता .ह्या उपायाने  acidity चा त्रास खूप चांगल्याप्रकारे कमी होतो. जर त्रास कमी नाही झाला तर तुमच्या जवळच्या doctors ना दाखवून घ्या 

डॉ नागरेकर 


टिप्पण्या

  1. Must information sir .mala chattit zalzat ani garmicha tras pn hoto tr to 20manukacha upay kela tr chlel ka

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान माहिती असते ,तुमची.तुमचे युट्यूब चँनेलला ही भेट देतो.छान च माहिती असते.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Immyunity booster -पावसाळ्यात immunity वाढवणारा आहार

मुलांना फोन देण्या पासून सावधान