मुलांची भूक वाढण्यासाठी काय करावे?
पालकांच्या समस्या
अनेक पालक मला प्रश्न विचारतात.आमच्या मुलाला भूख लागतच नाही.काय करावे ?
*या प्रश्नाचे उत्तर आम्ही तीन टप्प्यात देणार आहोत .पालकांचे मनोगत , मुलांचे मनोगत आणि आदर्श पालकांचे मनोगत .यामध्ये सर्व पालकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.*
*पालकांचे मनोगत*
====================================
आम्हाला आमच्या मुलांची खूप काळजी वाटत असते.त्यांच्या आरोग्य संदर्भात आम्ही खूप विचार करत असतो. त्यांच्या खाण्या-पिण्याकडे खूप बारकाईने लक्ष देत असतो.घरात खूप काही खाणारे पदार्थ आणून ठेवतो.जसे की ड्रायफ्रुट्स ,fruits इत्यादी. पण आमची मुलं काही खाताच नाहीत.त्यांना भूख लागतच नाही .कधी कधी तर आम्हाला लाडी गोडी लावून भरवावं लागत तेंव्हा कुठे ते थोडास खातात.मुलांना फक्त चटपटीत पदार्थ ,चॉकलेट, ice-cream खायला हवे असते.आम्ही त्यांना किती समजावलं चॉकलेट ने दात खराब होतात, ice cream ने सफडी होते.पण ते ऐकतच नाही अनु हट्ट करतात.मूलं नाराज व्हायला नको म्हणून आम्ही सर्व घरी आणून ठेवतो.पण मुलांना चॉकलेट , इस क्रीम सारख सारखं हवं असत. जेवायला कधीच नको असत.कधी कधी तर जेवण भरवलं तर ते उलटी पण काढतात आणि वारंवार आजारी पडतात.काय करायचं तेच कळत नाही.
सकाळी bournvita बरोबर दूध देतो .ते बरोबर पितात ,पण शाळेत दिलेला दाब अर्धवट खातात.शाळेत ला डबा जर अर्धाच खाल्ला तर घरी येऊन जेवायला नको का?ते पण टंगळ मंगळ करत जेवतात .स्वतःहून मागून तर कधीच जेवणार नाहि .आहार नीट घेतला नाही तर पोषण कस होणार .त्यामुळे अशक्तपणा येतो व ते आजारी पडतात.
आमची फक्त एवढीच इच्छा आहे कि मुलांनी भरपूर खावं आणि सुदृढ व्हावं .
========================================================================
*मुलांचे मनोगत*
=========≠==============================================================
मोठी माणस मला खूप लहान समजतात.माझी समस्या हि आहे की माझे आई बाबा समस्याग्रस्त आहे.मला या यागोष्टीची चिंता आहे की माझे आई बाबा चिंताग्रस्त आहे.मला ते चिंतेत असलेले बघवत नाही.मी या जगात त्यांना त्रास द्यायला आलो नाही.
त्यांना अस का वाटत कि मी सुदृढ नाही, मी जाड नाही.माझी उंची इतरांन प्रमाणे वाढत नाही.आई ला सतत वाटत असत कि मी काही खातच नाही.पण माझं पोट भरलेलं असताना मी कसा खाणार .तरी सुद्धा आई मला लाडी गोडी लावून भरवत असते .मग ती नाराज नको व्हायला म्हणून मी खात असतो.पण कधी कधी आई इतका भरवते कि माझ्या पोटात जागाच नसते व त्यामुळे मला चक्क उलटी होऊन जाते . मला उलटी करत पाहिल्यावर ती परत दुःखी होते.मग मलाही वाईट वाटत कि मी का उलटी केली .
सकाळी उठल्यावर बदाम खायचे ,दूध प्यायचं,नाश्ता करायचं नंतर शाळेत गेल्यावर डबा संपवायचा,घरी येऊन पुन्हा जेवायचं थोडावेळ झाला की परत दूध प्यायचं .एवढ सर्व खाल्यावर मला भूखंच लागत नाही .त्यातून मला चॉकलेट, ice cream आवडतात.हे सर्व घरी आणून ठेवलेल असल तरी मला देत नाही.मग आणून ठेवतात तरी कशाला .जर मी हट्ट केला तर मला सांगतात चॉकलेट ने दात खराब होतात,ice cream ने सर्दी होते .चॉकलेट ,ice cream जर एव्हढे खराब असतील तर मला पहिल्यांदा चॉकलेट दिला कोणी?चॉकलेट ची चव मला दाखवली कोणी? मी तर लहान आहे ,माझ्याकडे पैसे हि नाही की मी चॉकलेट विकत घेऊन खाईन.जर या गोष्टय खराब आहे तर मला या गोष्टींपासून लांब का नाही ठेवलं.आणि आता मला या गोष्टी आवडायला लागल्या आहे तर मला सांगतात खाऊ नको.मी जर कधी हट्ट केला तर मलाच ओरडतात मलाच मारतात.माफ मी करायचं तरी काय ?
खरतर मला माझ्या आई बाबांना एवढंच सांगायचं आहे .मला जेंव्हा भूख लागेल तेंव्हा मी मागून घेईन.मी काही पाहूणा नाही, खायला मागायला मला लाज वाटेल.ज्या गोष्टय तुम्हाला माहित आहे की त्या खराब आहे .तर त्या गाठी माझ्या पासून लांबच ठेवा.याने मलाही त्रास होणार नाही आणि आई बाबांची चिंता हि दूर होईल.
======================================================
आदर्श पालकांचे मनोगत *[पालकांनी कसा विचार करायला पाहिजे ]*
आम्हाला आमच्या मुलांची काळजी असते.त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो.वेळ पडली तर आम्ही तज्ज्ञांचे सल्ले घेऊन तशी कृती करतो.खाण्याच्या बाबतीत आमची मुलं खूप हुशार आहेत.त्यांना जेंव्हा भूक लागते तेंव्हा ते स्वतःहून सांगतात.आम्ही त्यांना कधीच खाण्यासाठी जबरदस्ती करत नाही .त्यांना हव आहे तेवढं ते खातात आणि खूप खेळतात.
चॉकलेट ,ice-cream , चटपटीत पदार्थांपासून आम्ही आमच्या मुलांना लांबच ठेवलं आहे.कधी बाहेर गेलो असता आमचे मित्रमंडळी त्यांना चटपटीत पदार्थ खायला देतात त्यावेळेला आम्ही त्यांना रोखत नाही .पण आम्ही स्वतःहून मुलांना हे पदार्थ कधीच देत नाही . त्यामुळे ते आमच्या जवळ कमी हट्ट करतात.
आम्हाला हे चांगलच माहीत आहे ;आमची मुलं नैसर्गिक पद्धतीने सुदृढ बनणार आहे . म्हणून जास्तीत जास्त निसर्गाच्या
जवळ मुलांना कस नेता येईल या कडे आम्ही जास्त लक्ष देतो.
डॉ सुशांत नागरेकर
नवी मुंबई

माझ्या मते, ते जो पर्यंत खरी भुक लागत नाही तो पर्यंत जेवायला मागत नाहीत. ... खरी भुक तेव्हाच लागते , जेव्हा ज्या कामात, खेळात शारिरीक कष्ट होतात.... शारिरीक कष्ट म्हणजे काय? हे खेड्यातील मुलांना विचारा...
उत्तर द्याहटवा