Immyunity booster - बाल्यावस्थेतील आहार




बाल्यावस्थेतील आहार-विहार

(सर्वांगीण वाढीचा पाया)

☘☘☘☘☘☘☘☘


आज मानव २१ व्या शतकाकडे वाटचाल करत आहे. चंद्रच नव्हे तर मंगळावर सुद्धा स्वारी करत आहे. क्रांतीतील नवं-नवीन शिखरे पादाक्रांत करीत  आहे. अफाट अशी प्रगती झाली आहे.


 पण............................... खरंच हि प्रगती सृजनशील आहे का? ह्याला आपण सुधारणा म्हणणार का?  


खरं सांगाल तर मला वाटते कि सध्या ही जी काही प्रगती आहे ती फक्त आणि फक्त भौतिक साधनांची.. निरोगी आयुष्याची तर नक्कीच नाही! अहो थोडं मागे वळून पहिले तर दिसून येईल की, माणूस चंद्रावर पोहचण्याच्या आधी सरासरी १०० वर्षे जगतच होता, आणि नुसतं जगताच नव्हता तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुखी व निरोगी आयुष्याचा आनंद घेत होता, आणि आज वयाची पन्नाशी गाठली कि कसल्यातरी गोळ्या खाऊन स्वतःला जगवावं लागत.


आता थोडा विचार करा हे असच चालू राहील तर काय होईल?


सध्याची पिढी ५० ते  ६० वर्षे जगतेय! पण आपली येणारी पिढी किती वर्षे जगेल माहितेय?... सरासरी ३० ते ४० वर्षे...!!!

तर मग जर या येणाऱ्या पिढीला आणि पर्यायाने आधी आपल्याला ही खऱ्या अर्थाने निरोगी व सदृढ आयुष्य जगायचे असेल तर योग्यच आहार घेतला पाहिजे, आणि तोही योग्य वेळेलाच.


मला आता सांगा कि, तुमच्यापैकी किती जणांना लहान मुलांच्या बाबतीत पुढील तक्रारी आहेत,

१) वारंवार सर्दी, खोकला असणे 

२) वारंवार आजारी पडणे 

३) भूक कमी लागणे

४) भरपूर खाउन पण अंगाला न लागणे

५) झोप कमी असणे

६) प्रत्येक कामात आळसपणा अशामुळे कार्यक्षमतेचा अभाव असणे


हे असं सगळं घडण्याचं कारण म्हणजे


लोणी खाणाऱ्या श्री कृष्णाच्या भारत देशात आजची पिढी बटर आणि चिज खातेय.

मोदक खाणाऱ्या गणपतीच्या देशात आजची पिढी बिस्कीट आणि ब्रेड खातेय.

आणि म्हणूनच *"जागो पालक"*च्या माध्यमातून हि सगळी स्वास्थ्यासंबंधातील व त्याच्याशी निगडित योग्य अश्या आहारसंदर्भातील माहिती आपल्यासाठी घेऊन येत आहेत 



वैद्य सुशांत  नागरेकर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पित्तासाठी (acidity )घरगुती उपाय

मुलांची भूक वाढण्यासाठी काय करावे?

Immyunity booster -पावसाळ्यात immunity वाढवणारा आहार