मुलांसाठी सर्वात जास्त पौष्टिक असणारा आहार
#पालकांच्या #समस्या
डॉक्टर तुम्ही सांगता बिस्कीट, ब्रेड,सिंथेटिक टॉनिक मुलांना देऊ नका.मग मुलांनी खायचं तरी काय?
बरेच पालक हा प्रश्न मला विचारतात.त्यांना अस वाटत ब्रेड , बिस्कीट शिवाय या जगात काही पदार्थच नाही आहेत.खर तर थोडं कष्ट घेऊन पदार्थ बनवण्याचा सर्वाना कंटाळा आहे .ब्रेड कसा 'रेडी टू ईट ' असतो.जास्त मेहनत घेण्याची गरज नाही आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे वेळही वाचतो.
मला नेहमी एक प्रश्न पडतो एवढा वेळ वाचवून आपण काय करतो.ब्रेड,सिंथेटिक पदार्थ वेळ वाचवतात , पण हाच वेळ नंतर हॉस्पिटलच्या एका बेड वर वाया जात असतो.याचा आपण विचार करतो का? असो काय खायचं नाही या पेक्षा काय खायचं याचा विचार आपण करू.
मनुष्य प्राणी निसर्गाचे अपत्य आहे.त्यामुळे निसर्ग बरोबर आपल्या अपत्यांना सांभाळत असतो.एक वाक्य वाचनात आले होते "local food is super food"ज्या देशात जे पिकतं त्या देशातील लोकांनि तेच खावे . जसे की कोकणात नारळाचे पीक जास्त येते . त्यामुळे तेथील लोकांच्या आहारात नारळाचेे प्रमाण जास्त असते . उत्तर भारतात मोहरीचे प्रमाण जास्त येते तर तेथील लोक मोहरीचे तेल वापरतात.
आपल्या पूर्वजांनी जे अन्न पदार्थ खाऊन आयुष्य जगलं आहे .तेच अन्न पदार्थ आपल्याला उपयोगी असतात.कारण आपण जे खातो त्याने आपले शरीर बनते .शरीराची प्रत्येक पेशी आपण जे खातो त्यानेच बनली असते . त्यामुळे आपले शरीरातील जनुके हि तसेच बनणार.आपल्या पूर्वजांची पंचन संस्था जे पचवण्यास सक्षम होती.तेच अन्न पदार्थ पचवण्याची क्षमता आपल्या पचन संस्थेत असणार.म्हणजे जर एखाद्याचे पूर्वज मांसाहारी असतील तर ती व्यक्ती मांसाहार पचवण्यास सक्षम असेल.जर एखाद्याचे पूर्वज शाकाहारी असतील तर ती व्यक्ती मांसाहार पचावण्यास तेवढी सक्षम कदाचित नसेल.म्हणून आपल्या देशात जे पिकते तेच अन्न पदार्थ आपल्या शरीर साठी उत्तम असतात.
पचवण्याची शक्ती प्रकृती वरही अवलंबून असते.पित्त प्रकृती च्या व्यक्तीला अन्न लवकर पचते,वात प्रकृतीच्या व्यक्तीला कधी अन्न लवकर पचते तर कधी उशिरा पचते ,कफ प्रकृतीच्या व्यक्तीला अन्न थोडं उशिरा पचते.तर प्रकृती नुसार गुरु लघु अन्न मात्रेत घ्यावे.
आपल्या देशातील वातावरण मध्ये ज्या वनस्पती पिकतात त्या वातावरणात वाढणाऱ्या मनुष्य प्राण्यांसाठी त्याचं वनस्पती लाभदायक असतात.
आता आपल्या देशात काय पिकवा .हे ठरवणारा निसर्ग असतो.आपली प्रकृती ठेवणारा निसर्ग असतो.म्हणून आपल पालन पोषण खऱ्या अर्थाने निसर्गच करत असतो.
सध्या बाळ जन्माला आल्या पासून त्याला सिंथेटिक फीड दिलं जात आहे.त्यामुळे पोषण कसे काय होते हे देव जाणे.निसर्ग आईचे दूध उपलब्ध करून देतो.तर शक्यतो आईचे दुधचं बाळाला पाजावे.काही स्त्रियांना दूध कमी प्रमाणात असते .त्यावेळेला दुसऱ्या स्त्रीचे दूध बाळाला पाजावे.ते हि उपलब्ध नसेल तर बकरीचे दूध किंवा गाईचे दूध बाळाला पाजावे.याने बाळाचे शरीर सुदृढ बनते, असे आयुर्वेद सांगतो.सहा महिने पूर्ण झाल्यावर बाळाला अन्न पदार्थ द्यावे .तेही द्रव स्वरूपातच द्यावे .दात यायला जेंव्हा सुरवात होते तेंव्हाच घंन पदार्थ बाळाला द्यावे.
आपण जे अन्न बाळाला देतो ते मोजमापामध्ये नसावे .उदाहरणार्थ-1 वाटी दूध दर 2 तासांनी .असे मोज मापेने देण्यापेक्षा बाळाच्या भुखे नुसार अन्न द्यावे.
खाली काही पोषक असे पदार्थ सांगत आहे .जे आपल्या बाळासाठी स्वास्थ्य टिकून ठेवण्यास मदत करतील .
1)ताजे लोणी 2 भाग + मध 1/2 भाग
2)बदाम 1/2(उगाळून घेणे )+1/2 तूप
3)खजुराचा कोळ गर्जे नुसार किंवा बाळाच्या भुखे नुसार
4) 5 काळ्या मनूका 1 /2 ग्लास पाण्यात 10 तास भिजत ठेवणे
10 तासांनी त्या मनुका फुगतात .
त्याच पाण्यात त्या मनुका कुसकरून (crush) पाणी उकळावे व गाळून थंड करून बाळाच्या भुके नुसार पाजावे
5)तांदळाचे पाणी
6) दूध + तूप+ भात + खडी साखर पातळ करून बाळाला पाजावे
7)मुगाचे पाणी
8)गायीचे दूध
9)फळ भाज्यांचे सूप
10) नाचणी सत्व
(वरील सर्व अन्न पदार्थ बाळाच्या भुखे नुसार द्यावं .अति प्रमाणात देऊ नये .डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.वयानुसार अन्न पदार्थ बदलू शकतात.6 महिन्या नंतरच्या बालकांसाठी पोषक वरील पदार्थ आहेत.)
डॉ सुशांत नागरेकर
नवी मुंबई
9987493534

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा