Immunity booster- 11 नियम



रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नक्की काय करावे ?

हा प्रश्न सध्या सर्वानाच पडत आहे . Immunity वाढवण्यासाठी अनेक प्रॉडक्ट सध्या बाजारात विकले हे जात आहे. आपण घरच्या घरी कोणते उपाय करू शकतो?


उपक्रम:


१. रोज केवळ गरम पाण्याचेच सेवन करावे.


२. रोज किमान ३० मिनिटे ध्यान, प्राणायाम आणि योगासने करावी.


(टीप: आपणांस उचित प्राणायाम आणि आसने जाणून घेण्यास वैद्यांचा सल्ला घ्यावा.)


३. स्वयंपाक करताना हळद, जिरे, धने, लसूण इ मसाल्यांचा वापर करावा.


४. रोज सकाळी १० ग्राम च्यवनप्राश खावा. मधुमेहींनी शुगर फ्री च्यवनप्राश घ्यावा.


(टीप: च्यवनप्राश खाऊन लगेच दूध पिऊ नये. मधुमेहींनी तसेच च्यवनप्राश अनुपलब्ध असल्यास आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा.)


५. तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ आणि मनुका घातलेला 'हर्बल टी' प्यावा. यात लिंबू रसदेखील घालू शकता.


(टीप: पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी काळी मिरी टाळावी. ५-६ काळ्या मनुका गरम पाण्यात भिजवून त्या कोळून मग अन्य घटक त्यात घालून एकदा उकळी काढावी आणि मग घ्यावे. या हर्बल टीचे सेवन सायंकाळी करणे अधिक उचित.)


६. १५० मिली दुधात अर्धा चमचा हळद घालून दिवसातून १-२ वेळा प्यावे.


(टीप: या दुधाचे सेवन केवळ सकाळी रिकाम्या पोटीच करावे. अपचन असल्यास वा दूध पचत नसल्यास वैद्यांचा सल्ला घ्यावा.)


७. सकाळ सायंकाळी तिळाचे तेल/ खोबरेल तेल कोमट करून दोन्ही नाकपुड्यांत लावावे.


(टीप: याकरता आपल्या दोन्ही करंगळ्यांचा स्वतंत्रपणे वापर करावा आणि आधी हात साबणाने स्वच्छ धुतलेले असावे.)


८. १ टेबल स्पून तिळाचे वा खोबरेल तेल कोमट करून तोंडात धरून २-३ मिनिटे आत फिरवावे आणि थुंकून टाकावे. कोमट पाण्याच्या गुळण्या कराव्या.


(टीप: या सोबतच हळद + कोमट पाणी अशा गुळण्या कराव्या.)


९. दिवसातून किमान एकदा ओवा वा पुदिन्याच्या पाण्याची वाफ घ्यावी.


१०. खोकला असल्यास लवंग + गूळ किंवा मध हवं मिश्रण घ्यावे.


(टीप: वैद्यकीय सल्ला आवश्यक)


११. आवश्यकता भासल्यास लगेच आपल्या जवळील वैद्यांचा सल्ला घ्यावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पित्तासाठी (acidity )घरगुती उपाय

मुलांची भूक वाढण्यासाठी काय करावे?

Immyunity booster -पावसाळ्यात immunity वाढवणारा आहार