Immyunity boost-बाळाला कितव्या महिन्यात अन्न द्यावे ?



*माझं बाळ 4 महिन्यांचा झालं आहे .पुढच्या महिन्या (पाचव्या महिन्या  पासून ) पासून बाळाला अन्न दिल तर चालेल *बाळाला कितव्या महिन्या पासून अन्न  द्यायला सुरुवात करावी?*


सध्या हे प्रश्न बरेच पालक मला विचारत असतात.त्यांचा विचारण्याचा उद्देश असा असतो "डॉक्टर , मला पुढच्या महिन्यातच कामावर रुजू होऊ लागणार आहे .त्यामुळे पुढच्या महिन्यात बाळाला दिवसभर दूध मिळणार नाही मग आतापासून अन्नाची सवय लावली तर बरं होईल ना?"


      पालकांचा विचार एका दृष्टीने गमतीदार असतो .सध्याच्या तिव्रगतीने धावणाऱ्या जगाला फास्ट फूड , फास्ट सरफींग , फास्ट ट्रॅव्हलिंग ,etc ची सवयच लागली आहे. त्यामुळे बाळाची वाढही फास्ट व्हावी अशी बऱ्याच पालकांची अपेक्षा असते. 


       आपण कधी सूर्याला सांगतो का , लवकर उगव लवकर मावळ , वडाच्या झाडाला म्हणतो का लवकर वाढ आम्हाला सावली लवकर पाहिजे .हे सर्व निसर्गाचे भाग आहे . मनुष्याला जन्म देणारी स्त्री असली तरी , मनुष्य खर अपत्य निसर्गाचे आहे.


        बाळाची पचनशक्ती निसर्गतः हळू हळू सुदृढ होत असते.पहिले पाच महिने बाळाची पचन क्रिया दुधालाच पचवू शकते .म्हणून पहिल्या पाच महिन्यात बाळाला दुधं द्यावे .सहाव्या महिन्या पासून क्रमशः अन्न प्राशनास सुरवात करावी .सुरवातीला द्रव पदार्थ द्यावे.दात यायला सुरुवात झाली की घन पदार्थ देण्यास सुरुवात करावी.

      असे केल्यास बाळाची पचन शक्ती सुदृढ होते व immyunity boost होऊन आजारी पाडण्याचे प्रमाण कमी होते .



वैद्य सुशांत नागरेकर 

नेरुळ , नवी मुंबई 


+91 9987 493 534

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पित्तासाठी (acidity )घरगुती उपाय

मुलांची भूक वाढण्यासाठी काय करावे?

Immyunity booster -पावसाळ्यात immunity वाढवणारा आहार