वजन वाढवायचे असल्यास काय करावे ?



"पालकांच्या समस्या"-
    
मुलां संबंधित पालकांना  अनेक समस्या असतात . जसे की ,मुलांचं वजन कसं वाढेल?उंची कशी वाढेल ? इत्यादी  यासाठी मुलांनी काय खायचं हे पालक ठरवतात. वेगवेगळ्या जाहिराती पाहून सिंथेटिक टॉनिक चा वापर मोठ्याप्रमाणावर करतात. या टॉनिक कंपन्या  आपल्या टॉनिक चा खप वाढावा म्हणून ते  चविष्ट  तयार करतात.  जाहिरातींमध्ये असे दाखवतात ,मुलांनी जर या टॉनिक चे सेवन केले तर मुले सुपरमॅन बनतील ,मुलाची उंची ,वजन लगेच वाढेल.या सर्व टॉनिक सेवनाने पोट बिघडते व मुल आजारी पडतात .आणि  त्यावर उपाय म्हणून वेगवेगळ्या औषधांचे सेवन केले जाते.

     खरतर मनुष्य प्राण्याला जन्म देणारी स्त्री असली तरी , तो अपत्य निसर्गाचा आहे .बाळाचे पोषण चांगले व्हावे म्हणून निसर्ग नेहमीच प्रयत्नशील असतो .त्यामुळे असे सिंथेटिक टॉनिक मुलांना देण्यापेक्षा नैसर्गिक पदार्थांपासून मुलांचे पोषण कसे होईल या कडे जास्त  लक्ष दिले पाहिजे.नैसर्गिकरीत्या मुलांना जेवढी भूक लागते तेवढाच त्यांना आहार दिला पाहिजे.बरेच पालक अतिप्रमाणात मुलांना खाऊ घालतात .त्यामुळे अपचन होते व मुलांचे पोषण पाहिजे तसे होत नाही.
       मुलांना नेहमी निसर्गाच्या जास्तीत जास्ती जवळ ठेवा.त्यांचे पोषण व्यवस्थितत होईल. मुलं सुदृढ होतील.

डॉ सुशांत नागरेकर
नवी मुंबई 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पित्तासाठी (acidity )घरगुती उपाय

Immyunity booster -पावसाळ्यात immunity वाढवणारा आहार