मुलांसाठी सर्वात जास्त पौष्टिक असणारा आहार
#जागो #पालक# #पालकांच्या #समस्या डॉक्टर तुम्ही सांगता बिस्कीट, ब्रेड,सिंथेटिक टॉनिक मुलांना देऊ नका.मग मुलांनी खायचं तरी काय? बरेच पालक हा प्रश्न मला विचारतात.त्यांना अस वाटत ब्रेड , बिस्कीट शिवाय या जगात काही पदार्थच नाही आहेत.खर तर थोडं कष्ट घेऊन पदार्थ बनवण्याचा सर्वाना कंटाळा आहे .ब्रेड कसा 'रेडी टू ईट ' असतो.जास्त मेहनत घेण्याची गरज नाही आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे वेळही वाचतो. मला नेहमी एक प्रश्न पडतो एवढा वेळ वाचवून आपण काय करतो.ब्रेड,सिंथेटिक पदार्थ वेळ वाचवतात , पण हाच वेळ नंतर हॉस्पिटलच्या एका बेड वर वाया जात असतो.याचा आपण विचार करतो का? असो काय खायचं नाही या पेक्षा काय खायचं याचा विचार आपण करू. मनुष्य प्राणी निसर्गाचे अपत्य आहे.त्यामुळे निसर्ग बरोबर आपल्या अपत्यांना सांभाळत असतो.एक वाक्य वाचनात आले होते "local food is super food"ज्या देशात जे पिकतं त्या देशातील लोकांनि तेच खावे . जसे की कोकणात नारळाचे पीक जास्त येते . त्यामुळे तेथील लोकांच्या आहारात नारळाचेे प्रमाण जास्त असते . उत्तर भारतात मोहरीचे प्रमाण जास्...